ग्रंथालय अनुदानात ३0 कोटींनी वाढ

ग्रंथालय अनुदानात
३0 कोटींनी वाढ
कर्मचार्‍यांची संख्या, पुस्तकांची संख्या, मूलभूत सुविधा आणि इतर अनेक बाबींसंबंधीचे निकष या ९१४ ग्रंथालयांनी पूर्ण केलेले नसल्याचे आढळले. अन्य ३२८ ग्रंथालयांमध्ये काही प्रमाणात उल्लंघन आढळले त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. मुंबई। दि. ६ (विशेष प्रतिनिधी)
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आखत्यारित येणार्‍या १२ हजार ५00 ग्रंथालयांपैकी ९१४ अपात्र ठरली आहेत. राज्य मंत्रिमंडळात आज सादर करण्यात आलेल्या तपासणी अहवालात ही माहिती देण्यात आली. ही ग्रंथालये आता बंद केली जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या अनुदानात ३0 कोटी रुपयांची वाढही करण्यात आली आहे.
राज्य शासन मान्यताप्राप्त ग्रंथालयांना दरवर्षी ६0 कोटी रुपये अनुदान देते. ते वाढवून ९0 कोटी रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ग्रंथालयांसाठी आवश्यक असलेल्या निकषांचे ९१४ ग्रंथालयांनी संपूर्ण उल्लंघन केले असल्याचे महसूल खात्याने केलेल्या तपासणीत समोर आले.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि तपासणी अहवालाची सर्व मंत्र्यांना देण्यात आली.


Comments