संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज

संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज
गुणवत्ता व संशोधनावर विशेष भर देण्याची गरज आहे. अतिर्शम व प्रामाणिकपणाने काम केल्यास संशोधन क्षेत्रात यश नक्कीच मिळते.
- डॉ. सी. एम. चितळे पिंपरी । दि. १७ (प्रतिनिधी)
देशाच्या विकासासाठी संशोधन क्षेत्राला अधिक प्राधान्य दिले पाहिजे, मात्र आपल्या देशात संशोधन विकासाला फारसे प्रोत्साहन दिले जात नसल्याची खंत पुणे विद्यापीठातील व्यवस्थापण शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर यांनी व्यक्त केली.
पुणे विद्यापीठ आणि औद्योगिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'रिसर्च मेथडॉलॉजी' या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते.
विद्यापीठ व्यवस्थापन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी. एम. चितळे, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशा पाचपांडे, डॉ. एस. एस. सहस्त्रबुद्धे, एएसएम ग्रुपचे रीसर्च संचालक डॉ. संतोष दास्ताने, डॉ. एस. पी. कल्याणकर, प्रा. राजकुमार घोष, प्रा. सत्येन मराठे आदी उपस्थित होते.
डॉ. खेडकर म्हणाले, ''संशोधनात्मक शिक्षणाने मुलांचा तर विकास होईलच, त्याचबरोबर देशाचे नाव उंचावेल. शैक्षणिक संस्थांनी संशोधनावर विशेष भर द्यायला हवा, शिक्षण क्षेत्रातील संशोधनाला महत्त्व आहे. देशाच्या प्रगतीत संशोधानाची मोलाची भूमिका असते. '' गुणवत्ता व संशोधनावर विशेष भर देण्याची गरज आहे. अतिर्शम व प्रामाणिकपणाने काम केल्यास संशोधन क्षेत्रात यश नक्कीच मिळते.
- डॉ. सी. एम. चितळे

    

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : (भीमगर्जने नंतरचे वादळ)