एआयसीटीई ' च्या या नव्या अभ्यासक्रमांना संस्थांकडूनही चांगला प्रतिसाद
Source :- http://www.epapergallery. com/ePaper.htm?SiteName=http:/ /maharashtratimes.indiatimes. com तंत्रशिक्षण आणि मॅनेजमेंटचा इंटिग्रेटेड कोर्स आणि मॅनेजमेंटचा ड्युअल डिग्री प्रोग्रॅम हे नवे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात राज्यातील तंत्रशिक्षण संस्था आघाडीवर आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) देशभरातून गेलेल्या प्रस्तावांमधील सुमारे २० टक्के प्रस्ताव महाराष्ट्रातून गेले आहेत. ' एआयसीटीई ' च्या या नव्या अभ्यासक्रमांना संस्थांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यंदा पहिल्याच वर्षी १९० प्रस्ताव आले असून , मॅनेजमेंटमधील ड्युअल डिग्री अभ्यासक्रमासाठी २१९ प्रस्ताव आले आहेत. यातील बहुतांश प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली असल्याने यंदापासूनच (२०१२-१३) या संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू होतील ,' अशी माहिती ' एआयसीटीई ' चे प्रभारी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांनी ' मटा ' ला दिली. ' प्रस्ताव पाठवणार्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्र