एआयसीटीई ' च्या या नव्या अभ्यासक्रमांना संस्थांकडूनही चांगला प्रतिसाद

Source :- http://www.epapergallery.com/ePaper.htm?SiteName=http://maharashtratimes.indiatimes.com 

तंत्रशिक्षण आणि मॅनेजमेंटचा इंटिग्रेटेड कोर्स आणि मॅनेजमेंटचा ड्युअल डिग्री प्रोग्रॅम हे नवे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात राज्यातील तंत्रशिक्षण संस्था आघाडीवर आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) देशभरातून गेलेल्या प्रस्तावांमधील सुमारे २० टक्के प्रस्ताव महाराष्ट्रातून गेले आहेत. 

एआयसीटीई च्या या नव्या अभ्यासक्रमांना संस्थांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यंदा पहिल्याच वर्षी १९० प्रस्ताव आले असून मॅनेजमेंटमधील ड्युअल डिग्री अभ्यासक्रमासाठी २१९ प्रस्ताव आले आहेत. यातील बहुतांश प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली असल्याने यंदापासूनच (२०१२-१३) या संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू होतील ,' अशी माहिती एआयसीटीई चे प्रभारी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा यांनी मटा ला दिली. 
प्रस्ताव पाठवणार्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील संस्था आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातून इंटिग्रेटेड कोर्ससाठी सुमारे ४० तर ड्युअल डिग्रीसाठी सुमारे ५० प्रस्ताव आले आहेत ,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एकीकडे इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटसारख्या तंत्रशिक्षण संस्थांतील रिक्त जागांची समस्या ऐरणीवर आलेली असल्याने त्यात नाविन्य आणण्याबरोबरच ते अधिक उद्योगपूरक आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे असावेतअसा एआयसीटीई चा उद्देश आहे. त्यातूनच मॅनेजमेंटचे ड्युअल डिग्री प्रोग्रॅम आणि तंत्रशिक्षण व मॅनेजमेंटचा एकत्रित अभ्यासक्रम देणारे इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्याची घोषणा यंदा एआयसीटीई ने केली. 

इंटिग्रेटेड कोर्समध्ये इंजिनीअरिंग फार्मसी आर्किटेक्चर आदी तंत्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षाला मॅनेजमेंटचा काही अभ्यासक्रम शिकवला जाईल. त्यानंतर वर्षभर पूर्णवेळ मॅनेजमेंटचे शिक्षण आणि नंतर सहा महिने प्रत्यक्ष उद्योगांमध्ये इंटर्नशिप केल्यावर डिग्री मिळेल. इंजिनीअरिंग फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स साडेपाच वर्षांचा तर आर्किटेक्चर विद्याशाखेसाठी साडेसहा वर्षांचा असेल. मॅनेजमेंटची कौशल्ये असलेले तंत्रज्ञ तयार करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे ,' असे मंथा यांनी नमूद केले. 

हे दोन्ही अभ्यासक्रम बारावीनंतर करता येणार आहेत. बारावीनंतरच्या मॅनेजमेंट किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांना सध्या आवश्यक असलेली पात्रताच याही कोर्सेससाठी ग्राह्य धरली जाईल. प्रत्येक संस्थेला या कोर्सेससाठी सध्या ६० विद्यार्थ्यांची एकच तुकडी करण्याची परवानगी मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती 222. ड्डद्बष्ह्लद्ग-द्बठ्ठस्रद्बड्ड.शह्म्द्द या वेबसाइटवर उपलब्ध आहे. 

बारावीनंतर मॅनेजमेंटचे शिक्षण घ्यायचे पक्के केलेल्यांना पाच वर्षांच्या ड्युअल डिग्री कोर्सचा फायदा होईल. यामध्ये तीन वर्षांनंतर बॅचलर्स डिग्री घेऊनही बाहेर पडता येईल. यामध्ये चार वर्षांनंतर अप्लाइड मॅनेजमेंटची डिग्री दिली जाईल तर पाच वर्षे पूर्ण केल्यावर थेट एमबीएची डिग्री मिळेल. 

डॉ. एस. एस. मंथा प्रभारी अध्यक्ष एआयसीटीई

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह