ग्रंथालय
ग्रंथालय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ग्रंथालय म्हणजे सर्व प्रकारची सर्वसाधारण पणे छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रीतपणे ठेवण्याची जागा. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहीत वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृकश्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय ही असू शकते. आंतरजालाच्या उपलब्धतेमुळे गालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावरही माहितीचा शोध घेता येतो. कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता माहितीतील वाढ ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.इतिहास
भारतात ग्रंथालयाचा प्राचीन इतिहास आहे. प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशिलेचे ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेकग्रीक तसेच चीनी प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते.प्राचीन पर्शिया येथील ग्रंथालये
प्राचीन रोम येथील ग्रंथालये
प्राचीन चीन येथील ग्रंथालये
ग्रंथालयांचे प्रकार
- शैक्षणिक ग्रंथालये
- व्यावसायिक ग्रंथालये
- ऐतिहासिक ग्रंथालये
- व्यक्तिगत ग्रंथालये
- लोक ग्रंथालये
- शालेय ग्रंथालये
- कायदा विषयक ग्रंथालये
- वैद्यकीय ग्रंथालये
व्यवस्थापन
ग्रंथालय व्यवस्थापनाचेशास्त्र आहे. पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते. ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धती म्हणजेच वर्गीकरण, तालिकीकरण होत. वर्गीकरण इ. साठी अनेक संगणक प्रणालीही आता उपलब्ध आहेत.याशिवाय ग्रंथालय व्यवस्थापनात खालील अंगेही महत्त्वाची मानली जातात.
- नवीन सदस्यांसाठी एक नोंदणीच्या वेळी वाचनालय कसे वापरावे याचे प्रशिक्षण देणे.
- आपले नियम सुकर आणि पुस्तके वापरणार्यांच्या दृष्टीकोनातून कसे आहेत हे तपासून पाहणे.
- आपली ग्रंथसंपदा केव्हढी आणि किती उपयोगी आहे याचे वेळोवेळी प्रदर्शन मांडणे.
- नियम 'का आहेत' हे सदस्यांना वारंवार समजावून देणे.
- ग्राहकसेवेचे प्रशिक्षण सर्व ग्रंथालय सेवकांना देणे - आणि कायम देत राहणे.
- ग्रंथालय आणि वाचक वेगळे नाहीत हे व्यवस्थापनाने मान्य करणे.
- मुक्त संचार देण्यासोबत सुरक्षेचे उपाय राबवणे.
- आपली ग्रंथ संपदा ही समाजाच्या गरजेशी निगडित आहे आणि राहिल हे सतत पाहणे.
प्रमाणीकरण
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भा षेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे.ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
आय एस ओ (International Organization for Standardization) (इंग्रजी:ISO) ने ग्रंथालयांच्या व्यवस्थापनाच्या प्रमाणिकरणाचे काही नियम प्रसिद्ध केले आहेत. (ही यादी परिपूर्ण नाही.)
- ISO 2789:2006 Information and documentation — International library statistics
- ISO 11620:1998 Information and documentation — Library performance indicators
- ISO 11799:2003 Information and documentation — Document storage requirements for archive and library materials
- ISO 14416:2003 Information and documentation — Requirements for binding of books, periodicals, serials and other paper documents for archive and library use — Methods and materials
- ISO/TR 20983:2003 Information and documentation — Performance indicators for electronic library services
हे ही पाहा
बाह्य दुवे
- ग्रंथालयांचे संगणकीकरण व नेटवर्किंग
- ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य
- ग्रंथालय-माहितीशास्त्रातील नवे प्रवाह
- पुस्तके कशी हाताळावीत याचे चित्ररूपातील प्रशिक्षण - नॉर्थवेर्स्टन विद्यापीठ, अमेरिका
- आंतरजालावरेएल अभ्यासपूर्ण लेख शोधण्यासाठी वापरात असलेले गुगल स्कॉलर हे शोधयंत्र
- गुगल स्कॉलर हे लेख शोधणारे तंत्रज्ञान कसे काम करते हे सांगणारा इंग्रजी भाषेतील लेख
ग्रंथालयांची सूची
- अमेरिकन लायब्ररी असोसिएशन वी ग्रंथालय यादी
- ११८ देशातील, ३४००० ग्रंथालयांची यादी
- अमेरिका येथील राज्यांप्रमाणे असलेल्या ग्रंथालयांची यादी
- आंतरजालावर उपलब्ध असलेल्या ग्रंथालयांची यादी
- जगातील ग्रंथालयांची वर्गिकरण झालेल्या सूचीची संपादित यादी - निवृत्त ग्रंथपालाने बनवलेली
- युरोप खंडातील राष्ट्रीय ग्रंथालय यादी
- युनेस्कोची ग्रंथालय यादी
अन्य संसाधने
- पुस्तक इतिहास अभ्यास केंद्र, इंग्लंड
- ग्रंथालय वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- आंतरराष्ट्रिय ग्रंथालय एकात्मिक संस्था
- जेनकिन्स - कायदा विषयक ग्रंथालय
- जॉन कॉटन दाना लिखित इ.स. १९०३ मधील ग्रंथालय चालवण्याचे मूलभूत प्रशिक्षण
Comments
Post a Comment