Posts

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !!

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !! जातिभेदाच्या अनेक दु:खद अनुभवांनी पोळलेल्या छोटया भीमाने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली. अत्यंत मन लाऊन त्याने अभ्यासात लक्ष घातले. त्याच्या वडिलांना फार आनंद झाला. आपल्या मुलाची वाचनाची गोडी पाहिल्यावर आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या मुलाला आवडतील ती पुस्तके खरेदी करून दिली. वेळप्रसंगी पैसे उधार घेऊन,आपल्या विवाहित मुलीच्या घरी जाउन लग्नात दिलेले दागिने मोडून त्यांना त्यांनी पैसे उभे करण्यास भाग पाडले. अर्थात या सर्व उधारीची त्यांनी परतफेड  केली. शिक्षकांचा सल्ला आणि स्वत:चा आतला आवाज यावर त्यांनी निर्धार केला की आपल्या मुलाला विद्वान करायचेच. एलफिस्टन हायस्कूल या त्या काळच्या अव्वल क्रमांकाच्या शाळेत दाखल झाल्यावर भीमाने अभ्यासात जीव ओतला. कसून अभ्यास केला. घरात अभ्यासासाठी शांत निवांत जागा नव्हती. मुंबईच्या परळ भागात जुन्या चाळीतल्या एका खोलीत तर बिऱ्हाड थाटलेले होते. सगळ्या वस्तू, भांडीकुंडी, चूल, स्वैपाक घर, झोपण्याची खोली, अभ्यासाची खोली असा संसाराचा पसारा त्या एकाच खोलीत होता. भीमाच्या अभ्यासाची जागा तीच होती आणि विश्रांतीची जागाही तीच

' संतशिरोमणी बाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले

Image
आज वरळीत ज्या ठिकाणी कामगार राज्य विमा मंडळाचे 'कामगार हॉस्पिटल' उभे आहे. त्या मैदानाला पूर्वी 'काळे मैदान ' असे संबोधिले जात होते. त्या मैदानावर प.पु.बाबासाहेब आंबेडकरांची जाहीर सभा होती. काळ असेल १९५२-५३ चा, संपूर्ण मैदान लोकांनी फुलून गेले होते. रस्त्यावर देखील लोकांना उभे राहण्यास जागा नव्हती . दुपारपासूनच लोकांचे थवेच्या थवे हातात निळे झेंडे घेवून, बाबासाहेबांचा जयजयकार करीत मैदानात जमा झाले होते. सभा संध्याकाळी सुमारे पाच वाजता सुरु झाली. अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली . शेकडो लोकांनी बाबासाहेबांना हार घातले. घोषणांच्या जयजयकारांत बाबासाहेबांचे भाषण सुरु झाले. प्रत्येक माणूस भारावल्याप्रमाण े जिथे जागा मिळेल तिथून अत्यंत शांतपणे बाबासाहेबांचा एक एक शब्द हृदयात कोरून ठेवत होता. एकूण एक माणूस बाबासाहेबांचे रुबाबदार सौंदर्य डोळ्यात साठवत होता. एकही माणूस जागचा हलत नव्हता . बाबासाहेब पण तल्लीन होऊन बोलत होते. इतक्यात स्टेजच्या उजव्या बाजूला, रस्त्याच्या कडेला काहीसा गोंधळ झाला. स्टेजच्या उजव्या बाजूची माणसे पटापट उभी राहिली .बाबासाहेबांनी सर्वांनी ब

छ. शाहु महाराजांच्या १४० व्या जयंतीदिनी लोकराजास विनम्र अभिवादन आणी तमाम बहुजन जनतेस हार्दिक मंगलकामना.

Image
  सामाजिक न्याय दिन" बहुजन समाजात शिक्षणप्रसाराला विशेष भर देणारा, सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा, जातिभेद निमृलनासाठी आंतरजातिय विवाहाला मान्यता देणारा, विधवा विवाहाला प्रोत्साहन देणारा, शेतकऱ्‍यांना मदत करणारा, त्यांना कर्ज उपलब्ध करुण देणारा, असे अनेक लोककल्याणकारी कायदे बनविणारा, लोकराजा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आणी मुकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य करणारा, ज्ञानाच्या राजाला स्वत: जाऊन भेट देणारा जनकल्याण राजा, असा हा थोर खरा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु  महाराज. २६ जुन १९०२ रोजी छ. शाहु महाराजांनी आपल्या कोल्हापुर संस्थानात बहुजनांना ५०% आरक्षण लागु केले. सर्वांना समान न्याय देणाऱ्‍या छ. शाहु महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करतो. बाबासाहेबांनीही म्हटले होते कि, शाहु महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करावी. आज दि. २६ जुन, छ. शाहु महाराजांच्या १४० व्या जयंतीदिनी लोकराजास विनम्र अभिवादन आणी तमाम बहुजन जनतेस हार्दिक मंगलकामना.

डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते

डॉ. बाबासाहेब इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट , वेळ आणि पैसा वाचावा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले .जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ .बाबासाहेब हे पहिले विद्यार्थी असायचे . सकाळी ७:०० ते रात्री ८: ०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत . दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती , म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि, पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत . एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने ब

बाबासाहब आंबेडकर जीकी अभ्यास पद्धती:-

बाबासाहब आंबेडकर जीकी अभ्यास पद्धती:- दोस्तों, इस देश के या पिछले सदी के पुरे विश्व में सबसे बुद्धिमान पुरुष डॉ. बाबासाहब आंबेडकर जीको चुना गया| आज हम उनकी अभ्यास पद्धती का अभ्यास करेंगे| बचपन में भीमराव को अभ्यास करने में दिलचस्पी नहीं थी| पिता रामजी जबरदस्ती उनसे अभ्यास करवाते थे| लेकिन, भीमा हमेशा पास होता थे| दसवी पास होने वाले वे महार समाज के पहले व्यक्ती थे| इसके बाद उन्हें पढाई में दिलचस्पी पैदा हुई| वे अभ्यास के लिए विलायत गए थे| वे हमेशा टेबल पर किताब रखकर और खुर्ची  पर बैठ करही पढाई करते थे| उनके हाथ में हमेशा एक पेन रहती थी| वे हमेशा एक विषय पढ़ने के लिए अनेक संदर्भ ग्रंथ साथ लेकर बैठते थे| आवश्यक दिखे लाइन पर रेखांकित करते थे| फिर विषय की पूरी जानकारी होने बाद वे अपनी भाषा में एक वही में टिपण्णी लिखते थे| इसी तरह बाबासाहब जीने अपनी जिंदगी में १००००० से ज्यादा किताबे पढ़ी है| उन्होंने सिर्फ किताबो के लिए राजगृह का निर्माण किया था| अगर आज भी आप इसे भेट देंगे तो इस लाइब्रेरी में हर विषय के किताबो के लिए अलग कपाट दिखेगा| अगर आप कोई भी किताब निकालके देखेंगे तो हर किताब मे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत