छ. शाहु महाराजांच्या १४० व्या जयंतीदिनी लोकराजास विनम्र अभिवादन आणी तमाम बहुजन जनतेस हार्दिक मंगलकामना.

 
सामाजिक न्याय दिन"
बहुजन समाजात शिक्षणप्रसाराला विशेष भर देणारा, सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा, जातिभेद निमृलनासाठी आंतरजातिय विवाहाला मान्यता देणारा, विधवा विवाहाला प्रोत्साहन देणारा, शेतकऱ्‍यांना मदत करणारा, त्यांना कर्ज उपलब्ध करुण देणारा, असे अनेक लोककल्याणकारी कायदे बनविणारा, लोकराजा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी आणी मुकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य करणारा, ज्ञानाच्या राजाला स्वत: जाऊन भेट देणारा जनकल्याण राजा, असा हा थोर खरा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज.
२६ जुन १९०२ रोजी छ. शाहु महाराजांनी आपल्या कोल्हापुर संस्थानात बहुजनांना ५०% आरक्षण लागु केले.
सर्वांना समान न्याय देणाऱ्‍या छ. शाहु महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करतो.
बाबासाहेबांनीही म्हटले होते कि, शाहु महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करावी.
आज दि. २६ जुन, छ. शाहु महाराजांच्या १४० व्या जयंतीदिनी लोकराजास विनम्र अभिवादन आणी तमाम बहुजन जनतेस हार्दिक मंगलकामना.

Comments

Popular posts from this blog

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह

ग्रंथालय

नेटवर्क ऐतिहासिक पाश्र्वभूमी