Posts

Showing posts from July, 2014

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !!

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग होय !! जातिभेदाच्या अनेक दु:खद अनुभवांनी पोळलेल्या छोटया भीमाने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली. अत्यंत मन लाऊन त्याने अभ्यासात लक्ष घातले. त्याच्या वडिलांना फार आनंद झाला. आपल्या मुलाची वाचनाची गोडी पाहिल्यावर आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून आपल्या मुलाला आवडतील ती पुस्तके खरेदी करून दिली. वेळप्रसंगी पैसे उधार घेऊन,आपल्या विवाहित मुलीच्या घरी जाउन लग्नात दिलेले दागिने मोडून त्यांना त्यांनी पैसे उभे करण्यास भाग पाडले. अर्थात या सर्व उधारीची त्यांनी परतफेड  केली. शिक्षकांचा सल्ला आणि स्वत:चा आतला आवाज यावर त्यांनी निर्धार केला की आपल्या मुलाला विद्वान करायचेच. एलफिस्टन हायस्कूल या त्या काळच्या अव्वल क्रमांकाच्या शाळेत दाखल झाल्यावर भीमाने अभ्यासात जीव ओतला. कसून अभ्यास केला. घरात अभ्यासासाठी शांत निवांत जागा नव्हती. मुंबईच्या परळ भागात जुन्या चाळीतल्या एका खोलीत तर बिऱ्हाड थाटलेले होते. सगळ्या वस्तू, भांडीकुंडी, चूल, स्वैपाक घर, झोपण्याची खोली, अभ्यासाची खोली असा संसाराचा पसारा त्या एकाच खोलीत होता. भीमाच्या अभ्यासाची जागा तीच होती आणि विश्रांतीची जागाही तीच