टेलिमार्क' विद्यापीठाशी करार
'टेलिमार्क' विद्यापीठाशी करार
| ||
पुणे विद्यापीठाच्या रुंदावल्या कक्षा
■ पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शिक्षणाबरोबर इतर मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जपानतर्फे संशोधनासाठी नुकत्याच झालेल्या स्वागतापाठोपाठ पुणे विद्यापीठाने र्जमनीच्या ट्युबिंगन विद्यापीठाशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. ■ पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाने उचललेले हे ठोस पाऊल आहे. यामध्ये पुणे विद्यापीठ अथवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्था तसेच ट्युबिंगन विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्थांतील विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान होणे सहज शक्य होणार आहे. परदेशातील शिक्षण पद्धतीची ओळखही होणार आहे. पुणे । दि. १९ (प्रतिनिधी) संशोधन व वैज्ञानिक प्रगतीसह मानवविकास साधण्यासाठी पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. नॉर्वेतील आघाडीच्या टेलिमार्क विद्यापीठाबरोबर पुणे विद्यापीठाने आज सामंजस्य करार केला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आणि टेलिमार्क युनिव्हर्सिटी कॉलेजचे रेक्टर नील्स क्रिस्टीयन बोगेन, कला व विज्ञान शाखेच्या प्रमुख मोनो साबो, आरोग्य व समाजशास्त्र विभागाचे अधिष्ठाता मरीन हेडलंड, संस्कृती इतिहास व भाषा विभागाचे प्रमुख टोन ओरीडॅलेन आदींच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. या प्रसंगी विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजीव सोनवणे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून हा करार करण्यात आला असून, विद्यार्थ्यांचे आदानप्रदान, संशोधन, प्राध्यापकांनाही अभ्यासाची संधी या दृष्टीने हा करार उपयुक्त ठरेल, असे मत संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली. पुढील पाच वर्षांसाठी हा करार राहणार असून, त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे, असेही डॉ. खरे म्हणाले. ■ टेलिमार्क विद्यापीठाबरोबर पुणे विद्यापीठाने सामंजस्य करार केला. याप्रसंगी डॉ. वासुदेव गाडे, रेक्टर नील्स क्रिस्टीयन व इतर. |
Comments
Post a Comment