नवा अड्डा 'गुगल हँगआउट' जगभरातल्या नेटकरांमध्ये वेगाने लोकप्रिय होणारा

नवा अड्डा 'गुगल हँगआउट'
जगभरातल्या नेटकरांमध्ये वेगाने लोकप्रिय होणारा
हे अड्डे शोधायचे कसे?
गुगल प्लसच्या संकेतस्थळावर जाऊन वेगवेगळ्या विषयांसाठी जगभरातल्या लोकांनी उघडलेले हँगआउटस् सर्च करता येतात. तुमच्या आवडीच्या विषयातल्या अड्डय़ात तुम्हाला जॉइन व्हायचे असेल, तर तशी 'रिक्वेस्ट' पाठवावी लागते. त्या हँगआउटच्या अँडमिनीस्ट्रेटरने तुमची रिक्वेस्ट अँक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही त्या अड्डय़ात सहभागी होऊ शकता.
स्वत:चा नवा अड्डा उघडायचा असेल तर? गूगल प्लसच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमचा नवा हँगआउट सुरू करता येतो.
त्या अड्डय़ावर तुमच्या मित्रमंडळींना निमंत्रित करता येते. जगाच्या वेगवेगळ्या भागांत विखुरलेले नातेवाईक, मित्र, व्यावसायिक सहकारी यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळे अड्डे तयार करू शकता. गुगल हँगआउट म्हणजे काय?  गुगल प्लस ही सेवा आणि जी-मेल या गूगल मेलच्या वापरकर्त्यांसाठी ऑनलाइन एकत्र येण्याचा नवा अड्डा म्हणजे गूगल हँगआउट. ही एक ऑनलाइन कम्युनिटी असून, एकावेळी कम्युनिटीतले दहा जण व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून ऑनलाइन गप्पा करू शकतात. या गप्पा जिथे चालतात, तो (कम्युनिटीचा) यूआरएल ज्यांच्याकडे असेल, असा कोणीही इंटरनेटचा वापरकर्ता त्यावेळी लॉग ईन करून या गप्पा ऐकू आणि अर्थातच पाहू शकतो. या हँगआउटस्वर यूट्यूबचे अँप अँड केले तर त्या अड्डय़ावरले सर्व मिळून एकाच वेळी एकच सिनेमा पाहणे, पत्त्याचा डाव खेळणे असल्याही गोष्टी करू शकतात. मुंबई। दि. ५ (प्रतिनिधी)
नरेंद्र मोदी असोत, मिशेल ओबामा वा पी. चिदंबरम.. ज्या ज्या म्हणून कुणाला आपला मुद्दा पुढे रेटायचा आहे, शंकांचे निवारण करायचे आहे, आरोपांचे खंडन करायचे आहे वा सरळसरळ आपला अजेंडा जगापुढे मांडायचा आहे, अशा प्रत्येक 'सेलिब्रिटी'साठी एक नवा अड्डा वेगाने लोकप्रिय होतो आहे, त्याचे नाव 'गुगल हँगआउट.'
अलीकडेच या अड्डय़ावर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना गाठून एका शहरी मध्यमवर्गीय महिलेने त्यांना विचारले, 'शहरातल्या मध्यमवर्गाच्या खिशावर प्रत्येक अर्थमंत्र्याचा डोळा असण्याचे कारण काय? आम्हाला किती कसरत करावी लागते हे तुम्ही लक्षात का घेत नाही?'
अर्थमंत्री म्हणाले, 'तुमचे खरे आहे; पण तुमच्या खिशात थोडा हात घालण्यावाचून मला पर्याय नाही, दोनवेळच्या अन्नाला महाग गरिबांपेक्षा तर तुमची अवस्था बरीच आहे की.'
या गप्पांच्या अड्डय़ावर अर्थमंत्र्यांशी संवाद करायला या शहरी महिलेबरोबर ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, उद्योगपती आणि आयआयएमचे विद्यार्थीही होते.
तेच अमेरिकेच्या फस्र्ट लेडी मिशेल ओबामा यांचेही. फास्ट फूडचे बकाणे भरून सतत टीव्हीसमोर ठाण मांडून बसणार्‍या लठ्ठ अमेरिकन शाळकरी मुलांनी जरा शरीराची हालचाल करावी यासाठी 'लेट्स मूव्ह' नावाची एक विशेष मोहीम मिशेलबाई चालवतात. या उपक्रमाचा वाढदिवस त्यांनी गूगल हॅँगआउटच्या अड्डय़ावरच मनमुराद नाचून साजरा केला. त्याआधी महिनाभरच बराक ओबामा यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासातला पहिला जनतादरबार या गूगल हँगआउटवर भरवला होता.
सार्‍या जगाचे व्यवहार आपल्या कब्जात घेऊ पाहणार्‍या गूगलचे हे नवे हँडल जगभरात वेगाने लोकप्रिय होत असून, देशोदेशी पसरलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींचा ऑनलाइन अड्डा भरवण्यास उत्सुक असलेल्या सामान्य नेटकरांपासून जगाच्या दोन टोकांवर बसलेल्या आपल्या स्टाफला मिटिंगसाठी एकत्र आणण्याची जरूर असलेल्या बड्या कंपन्या आणि काही विशिष्ट 'मेसेज' एकाचवेळी सर्वत्र पोचवण्यासाठी उत्सुक असलेले राजकीय नेते, विचारवंत आणि शास्त्रज्ञही या ऑनलाइन अड्डय़ाचा उपयोग करू लागले आहेत.
चीन, थायलंड आणि व्हिएतनाम वगळता सर्व देशांतल्या गूगल वापरकर्त्यांसाठी ही सेवा उपलब्ध झाली आहे.
हे अड्डे मोबाइलवर जमवण्यासाठी अँप्स उपलब्ध असून, बहुतेक सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्सवर ती डाऊनलोड करता येतात.

    
     

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह