राष्ट्रपिता ज्योतीराव फुले
११ एप्रिल १८२७ ज्योतिबा गोविंदराव फुले हे थोरपुरुष सातारा जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्माले आले. सर्वात प्रथम महात्मा फुले यांनी शिक्षण चळवळीला सुरवात केली, आणि शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारात आणून सोडली म्हणूनच आज आपण ऑफिसमध्ये बसू शकतो. एवढे महान कार्य होऊनही महात्मा फुलेंचा जन्मदिन... वा स्मृतिदिन शिक्षकदिन वा शिक्षणप्रसारक दिन म्हणून साजरा होत नाही, यांची मनात कुठे तरी खंत आहे.
आज ग्रामीण भागात कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत शिक्षण पोहचले आहे, खेडेगावातील तरुण मुलेही शिक्षणाच्याजोरावर विवध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहेत, परंतु खेडेगावातील मुलांना कुठे तरी मार्गदर्शन कमी पडते आहे असेही थोडे-फार जाणवते. जगाकडे पाहता ग्रामीण मुलेही विज्ञान क्षेत्राकडे वाटचाल करताना दिसतात, यासारखी चांगली बाब हीच. अभियांत्रिक व वैद्यकीय या क्षेत्राकडे ग्रामीण मुलांच्या आकडेवारीचा वाढता कौल आहे. आणि अशी महाविद्यालयेही खेडोपाडी पोहचवली ते महात्मा फुलेंपासून ते कर्मवीर भाऊराव पाटीलांपर्यंत, तात्यासाहेब कोरेंपासून ते छ. शाहू महाराजांपर्यंत. महाविद्यालयांची शुल्केही आवाक्याच्या बाहेरील असतात तेव्हा शैक्षणिक कर्ज या योग्य पर्यायाचा फायदाही होऊ लागला. विज्ञान क्षेत्रान हळू- हळू प्रभुत्व दिसू लागलेच आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे कला आणि वाणिज्य यामध्ये जरी प्राविण्य दिसत असले तरी ते अंमलात आणण्यात ते मागे पडत आहेत असे दिसून येते. आज वृत्तपत्रे, मनोरंजनाची साधने, प्रसार माध्यमे यांच्यामुळेही एक व्यासपीठ लाभले आहे, याकडे आजची मुले दुर्लक्ष करताना दिसतात. MPSC , UPSC च्याही वाटचालीमुळे कला आणि वाणिज्य क्षेत्र जास्त अंमलात येताना दिसतेय यासारखी आनंदाची बाब नाही. लोकसेवा परिक्षा, बँकाच्या परिक्षा, इतर स्पर्धा परिक्षा, पोलीस भरती याकडे आवर्जून लक्ष पाहिजे यात इंटरनेटचाहि फायदा घ्यावा. या परीक्षांकडे वाटचाल करणाऱ्या मुलांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण अगदी बोटांवर मोजण्या इतके असते. या वरून असे दिसून येते की ग्रामीण भागात अजून याबद्दल मार्गदर्शन हवे आहे. विद्यार्थ्यांनीही परीक्षांचे अर्ज कधी निघतात, कुठे मिळतात, यातून प्रगती करण्याचा अभ्यास ठेवावा व यासाठी हवी असणारी धडपड अंगी जोपासावी. आपण शिक्षणदेवता फुलेंची मुले परंतु यातच मागे का ? सर्व क्षेत्रात क्रांती आपणच करायची आहे...
राष्ट्रपिता ज्योतीराव फुले
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
---------सविता राजेंद्र बाविस्कर --------
Comments
Post a Comment