शूरवीर छत्रपती शाहू महाराजांची ती माणगाव परिषदेतील गर्जना

लोककल्याणकारी राजा -

शूरवीर छत्रपती शाहू महाराजांची ती माणगाव परिषदेतील गर्जना
भीमराव हाच आहे तुमचा भावी नेता सांगून गेली उपस्थित बहुजना,

आज ही प्रत्ययास येई आम्हा ना जन्मा आला ऐसा नेता पुन्हा
बलुते पद्धती करता नष्ट त्यांनी नामशेष केले हो कुलकर्णी वतना,

इंग्रज राजवटीतही ऐसा नेता लाभला गुलामितील गोरगरिब दीना
जरी सत्ताधीश होते तरी मानवतावाद होता त्यांच्या मना,

केले जनकल्याण देऊन अर्थ सहाय्य कलावंतां अन विद्वाना
ईश्वर पूजा समजुन करण्या दीनदलितांची सेवा उभारल्या संस्था लोकशिक्षणा,

शेतकऱ्यां देऊन सवलती केली प्रगती अन केली बहुमोल शेती सुधारणा
पाहून समाजसेवा जो तो स्मरतो कल्याणकारी राजाच्या कोल्हापूर संस्थांना,

भीमसैनिक अरविंद नतमस्तक होऊन वंदन करून गातो उद्धारकर्ताच्या गुणा
ज्या छत्रपती शाहू महाराजांनी मदतीचा केला हात पुढे सुभेदार रामजीच्या नंदना !
- भीमसैनिक अरविंद बनसोड, पुणे

Comments

Popular posts from this blog

जेष्ठ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनात महान ठरली आहे

ग्रंथालय

ग्रंथालय व माहितीशास्त्रातील नवे प्रवाह